Posted by: indianknights | February 9, 2010

A Different Goa

गोव्यात बहुतेक लोक मौजमजेसाठी जातात. सारस्वत जातीचे लोक आपापल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी वर्षातून एकदा तरी जातात. जे महाजन असतात, त्यांना (मंगेश) मंगेशी, (शांतादुर्गा) कवळे, (महालक्ष्मी) बांदिवडे इत्यादी देव संस्थानात माफक दरात  राहण्याची सोय असते. याशिवाय नागेश, रामनाथ, यांचीसुद्धा सुव्यवस्थित मंदिरे आहेत. तरी गोव्यात आल्यावर आणि या मंदिरांच्या निवासस्थानात राहतांना जेवणाखाण्याची  सुविधा तितकीशी समाधानकारक नाही, हे सांगितले पाहिजे.
यंदा येथे येताना आम्ही देवदर्शनास जरी आलो, तरी त्याबरोबर इतर काही खास नजरेखालून घालावे असा विचार केला होता आणि त्याची  माहिती जमा केली होती.  नेहमी उत्तर गोव्यात जाऊन तिथले बिचेस तेच तेच काय पाहायचे ? त्यापेक्षा दक्षिण गोव्यातील निसर्ग का पाहू नये ? तिथे महावीर राष्ट्रीय अभयारण्य आणि प्रसिद्ध दूधसागर धबधबा ही ठिकाणे प्रेक्षणीय आहेत, त्याकडे मोर्चा वळवला.
सोनावाला  गावचा  दूध सागर धबधबा पाहण्यासाठी नऊ किलोमीटर्सच्या  खडतर मार्गावरून  जीपने जावे लागते. तेथे तासाभरात   पोचल्यावर  पदभ्रमण केले तर काही अंतरावर  या दिवसातही ३०० मीटर्स  उंचीवरील  धबधब्याचे व तेथील माकडांचे जवळ जाऊन दर्शन घेता येते. घाटमाथ्यावर कासला आणि पाळणा  या नद्यांच्या संगमातून दूधसागर नदी तयार झाली आहे आणि ती उंच डोंगरावरून दुधा सारखी फेसाळत खाली येते. महावीर अभया र ण्यात असलेल्या या जल प्रपाताचा निसर्ग सुन्दर अनुभव घेण्यासाठी देशी पर्यटकांपेक्षा विदेशी पर्यतकांचा ओघ तेथे चालू असतो. कुळे रेल्वे स्थानकातून, तसेच मोले येथून या धबधब्याकडे जाता येते. येथील खडकाळ रस्त्यावरून जाण्यासाठी ६ जणांसाठी रु.१८०० मध्ये एक जीप भाडयाने घेता येते.
महावीर अभयारण्यात आम्ही सकाळी लवकर जायला हवे होते, म्हणून त्या ऐवजी आम्ही दूधसागर धबधब्यावरच जाण्याचे ठरवले.
पणजीपासून जवळच असलेल्या चोड़ण बेटावरील  १.७८ चौरस किलो मीटर परिसरातील  डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य हे एक असेच स्थळ आहे. तेथे वन खात्याची बोट १२ जणांसाठी रु. ९०० मध्ये भाड्याने मिळते. वाटाड्याही बरोबर येतो. स्थलांतरीत पक्षी पाणथळ प्रदेशात आपले भक्ष्य पकडण्यास येतात त्यांचे निरिक्षण करण्याची ही उत्तम संधी आहे.  तसेच तांबडी सुर्ल, साकोर्डा या गावातील १३ व्या शतकातले शिवालय हा शिल्पकलेचा दुर्मिळ नमूना भेट देण्याजोगा आहे.

आम्ही ही स्थळे प्रथम पाहत होतो. तिथे सकाळी लवकर आले पाहिजे, हे समजले. बाकी माहिती जमा करून पुन्हा तयारीने येथे यावे असा विचार आहे. या सर्व ठिकाणी आपल्या भारतीय लोकांपेक्षा परकीय गोरे पर्यटक बहुसंख्येने होते, हेविशेष.
Advertisement

Responses

  1. Nice blog…Goa gives you a different experience every time you go there!

  2. u r right…goa madhe pahanya sarkhe khup aahe other dan d beaches and foreigners.


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s

Categories

Follow

Get every new post delivered to your Inbox.